अ क्र | योजना | सविस्तर माहिती |
1 | योजनेचे नाव | इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना |
2 | योजनेचा प्रकार | केंद्र पुरस्कृत योजना |
3 | योजनेचा उददेश | राज्यातील निराधार व्यक्तीना दरमहा निवृत्तीवेतन |
4 | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव | सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे. |
5 | योजनेच्या प्रमुख अटी | दारिद्रय रेषेखालील 65 व 65 वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र होतील. या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून गट (अ) रु.400/- प्रतिमहा निवृत्तीवेतन मिळते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रुपये 400/-प्रतिमहा व केंद्र शासनाकडून रुपये 200/-प्रतिमहा असे एकूण रुपये 600/-प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन मिळते. |
6 | दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप | प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा करण्यात येते. |
7 | अर्ज करण्याची पध्दत | अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो |
8 | योजनेची वर्गवारी | निवृत्तीवेतन |
9 | संपर्क कार्यालयाचे नाव | जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय |
स्ञोत - https://sjsa.maharashtra.gov.in